Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

याssssक... तुम्ही खाताय त्या मिठाईत सापडले कीडे अन् अळ्या | Kalyan News

Kalyan Sweets Shop Complaint Filed: कल्याण शहरातील एका मिठाईच्या दुकानातील मिठाईमध्ये किडे आणि अळ्या आढळले आहेत. ज्यामुळे कल्याण परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.

Bhagyashree Kamble

कुछ मीठा हो जाये म्हणत आपण मिठाई आणतो, वाटतो आणि खातो. गोड खाण्याची इच्छा झाली की आपण मिठाईच्या दुकानात जात आवडीची मिठाई खरेदी करून खातो. पण याच तोंड गोड करणाऱ्या मिठाईत किडे आणि अळ्या आढळले आहेत. कल्याण शहरातील एका मिठाईच्या दुकानातील मिठाईमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. ज्यामुळे परिसरातील नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.

कल्याण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मिठाईच्या दुकानातून घेतलेल्या मिठाईत किडे आढळले आहेत. मिठाईच्या दुकानातील मिठाईत किडे आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकानं महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या सुनीता भगत यांनी कल्याणच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगण जवळ असलेल्या मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी केली. ही मिठाई घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी बॉक्स उघडला. मिठाई पाहताच त्यांना धक्काच बसला. मिठाईत अळ्या आणि किडे आढळले.

या प्रकरणी भगत यांनी दुकानदाराला जाब विचारला, त्यानंतर भगत यांनी तात्काळ महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला याची माहिती दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे . दरम्यान, संबंधित मिठाईच्या दुकानावर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT