Woman keeps 350 cats in her house saam tv
मुंबई/पुणे

Pune News : सोसायटीमध्ये दुर्गंधी, आरोग्याच्या समस्या; नागरिकांच्या तक्रारी, पुण्यातील महिलेचा धक्कादायक प्रताप

Pune News : पुण्यातील महिलेचा धक्कादायक प्रताप, घरात तब्बल ३५० मांजरी पाळल्या; नागरिकांना नको तो त्रास

Saam Tv

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: आजकाल अनेकांना घरात पाळीव प्राणी ठेवण्याची आवड असते. कुत्रे, मांजरी, पक्षी असे प्राणी घरगुती करमणुकीसाठी पाळले जातात. त्यानंतर त्यांचे त्या प्राण्यांनसोबत एक भावनिक नाते निर्माण होते . हळूहळू हेच प्राणी घरचे सदस्य होऊन जातात .मात्र, हे किती प्रमाणात पाळावे यालाही काही मर्यादा असते. पुण्यात एका महिलेने घरात तब्बल 350 मांजरी पाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण सोसायटीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा प्रकार हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये समोर आला आहे. एका 3BHK फ्लॅटमध्ये 350 मांजरींचा वावर असल्याने परिसरात दुर्गंधी, आरोग्याच्या समस्या आणि सततचा आवाज यामुळे रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मांजरांचा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि मोठ्या आवाजातील ओरडणे यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि त्रासदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवाशांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

विशेषत: इतक्या मोठ्या प्रमाणात मांजरी पाळल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. मांजरांमुळे काही संक्रामक रोग देखील पसरू शकता. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.या घटनेमुळे पुणेकरांमध्ये या चर्चेला उधाण आले आहे. महानगरपालिकेची पुढील कारवाई काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी सोसायटीतील रहिवाशांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य ती पावले उचलून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT