CCTV footage captures the moment a metal roof collapsed on a woman walking in Vasai, leaving her seriously injured. saam tv
मुंबई/पुणे

Shocking: पायी चालणाऱ्या महिलेच्या अंगावर कोसळलं पत्र्याचं छत; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Tin Roof Crashes On Woman: वसईमध्ये एका महिलेच्या अंगावर पत्र्याचे छप्पर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Bharat Jadhav

  • वसईमध्ये पायी चालणाऱ्या महिलेच्या अंगावर पत्र्याचे छत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.

  • या दुर्घटनेत दीपा अमित दिनोजीया या महिला गंभीर जखमी झाल्या.

  • जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

मनोज तांबे, साम प्रतिनिधी

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात फुट ओव्हर ब्रिजवर लावलेलं होर्डिंग एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळल्याची घटना एक दिवसापूर्वी घडली होती. आता वसईमध्येही अशीच एक घटना घडलीय. येथे एका पायी चालणाऱ्या महिलेवर पत्र्याचं छत कोसळलंय. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, दीपा अमित दिनोजीया असे या जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. दीपा दिनोजीया यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिरावली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना 5 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली होती.

मागील आठवड्यात मुंबईसह उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला होता. मुसळधार पावसामुळे वसई-विरार जलयम झाला होता. त्याचदरम्यान ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक सदर महिला आणि एक इसम पावसात छत्री घेऊन रस्त्याच्या एका बाजूकडून चालत होते. परिसरात हलक्या स्वरुपाचा पाऊस चालू आहे. त्यामुळे दोघांनी डोक्यावर छत्री घेतलेली दिसत आहे. महिला पुढे चालतेय तर पुरुष तिच्या मागे चालतोय. ते दोघेही एका दुकानासमोर आले असतानाच एका दुकानाचे पत्र्याचे छत्र अचानक कोसळलं. यात महिला गंभीररित्या जखमी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Politics: धाराशिवमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने, १० ते १२ वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

Pratapgad Fort : शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार! प्रतापगड किल्ल्याची 'ही' अनोखी गोष्ट अनेकांना माहीतच नाही

Sharavan Special : श्रावणात 'हे' ७ पदार्थ खाणं टाळा; नाहीतर...

Cabinet Decisions : राज्य सरकारचा मोठा निर्णय; भूमिहीन शेतमजूर, महिला शेतकऱ्यांना दिलासा, या योजनेला ३ वर्षे मुदतवाढ

Maharashtra News Live Update: तिलारी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे घोटगे-परमे पूल पाण्याखाली

SCROLL FOR NEXT