Crime News Saam Tv News
मुंबई/पुणे

Bhiwandi Crime News: सासऱ्याचा २० वर्षीय सुनेवर डोळा; खोलीत डांबलं, मित्रासह नवविवाहितेवर बलात्कार

Crime against women in Bhiwandi: २० वर्षीय पीडित नवविवाहीत सुनेवर सासऱ्यासह त्याच्या मित्राने बलात्कार केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

फैयाज शेख, साम टीव्ही

सासरा आणि सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. २० वर्षीय पीडित नवविवाहीत सुनेवर सासऱ्यासह त्याच्या मित्राने बलात्कार केला आहे. आधी खोलीत डांबून ठेवलं आणि आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत, आरोपींनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केला. ही धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरूणी मुळची राजस्थान राज्यातील आहे. नंतर ते मुंबईत स्थायिक झाले. तिचं नुकतंच लग्न झालं होतं. दरम्यान ३० जानेवारीला ४२ वर्षीय नराधम सासरा पीडित सुनेला वडिलांकडे सोडण्याच्या बहाण्यानं भिवंडीत स्वतःच्या घरी घेऊन गेला.

त्या खोलीत पीडितेला डांबून ठेवलं. नंतर तिच्यावर सासऱ्यासह त्याच्या मित्रानं ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत वारंवार बलात्कार केला. हा सर्व प्रकार १५ दिवस सुरू होता. आई - वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत नराधम सासरा आणि त्याच्या मित्रानं बलात्कार केला. सासरा आणि तिचा मित्र घरी झोपले असल्याची संधी साधत पीडित तरूणीनं घरातून पळ काढला. पळ काढल्यानंतर तरूणीनं थेट तिचे माहेर गाठले. तेव्हा सत्य समोर आलं.

त्यानंतर पीडित तरूणी आणि तिच्या आई वडिलांनी नारपोली पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, १२७(४), ३५१ (३), ७४, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून, पोलीस पथक दोघांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT