Nalasopara Crime news Saam Tv News
मुंबई/पुणे

Crime: नालासोपारा हादरले! आईने पोटच्या १५ वर्षीय मुलीचा घेतला जीव, खलबत्ता डोक्यात घातला अन्...

Nalasopara Crime news: नालासोपाऱ्यात आईनेच आपल्या १५ वर्षांच्या मुलीची हत्या केली. खलबत्ता डोक्यात घालून मुलीला जागीच संपवलं. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. पोलिस तपास सुरू आहे.

Priya More

Summary -

  • नालासोपाऱ्यात आईने मुलीची निर्घृण हत्या केली

  • खलबत्त्याने डोक्यावर वार करून जीव घेतला

  • आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली

  • हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

मनोज तांबे, नालासोपारा

नालासोपाऱ्यांमध्ये आईने १५ वर्षीय मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला मारहाण करत खलबत्ता डोक्यात घालण्यात आला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील संतोषभुवन परिसरातील टांडा पाडा येथील विद्या विकास मंडळ चाळीत शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली घडली. अज्ञात कारणातून आईनेच आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. अंबिका प्रजापती (वय १५ वर्षे) असं हत्या झालेल्या मुलीचे नाव होते. तर कुमकुम प्रजापती असं आरोपी महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

अंबिका प्रजापती ही पाच भावंडांपैकी सर्वांत मोठी होती. प्राथमिक माहितीनुसार ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास घडली. सुरुवातीला गळा चिरून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी आई कुमकुम प्रजापतीने खलबत्त्याने मुलीच्या डोक्यावर वार करून तिचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी महिलेला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: राग संपवू नका, त्यावर नियंत्रण ठेवा; चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Microsoft Layoffs: 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं; Microsoft च्या निर्णयामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT