Drug Addict Kills Coconut Vendor in Govandi over money Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत पहाटे रक्तरंजित थरार; नारळ विक्रेत्यावर चाकू हल्ला, हत्येमागचं कारण काय?

Drug Addict Kills Coconut Vendor in Govandi over money: गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात नारळ विक्रेत्याची हत्या. चाकूने वार करून हत्या केल्याची माहिती. आरोपी अटकेत.

Bhagyashree Kamble

गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंबेडकर गार्डन परिसरात नारळ पाणी विक्रेत्याची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना ३० ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. आरोपी तरूणानं नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी नारळ पाणी विक्रेत्याची हत्या केली. या हल्ल्यात पीडित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव मीर कासिम असून, तो आंबेडकर गार्डन परिसरात नारळ पाणी विकायचा. तर, साजिद कुरेशी (वय वर्ष २०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा त्याच परिसरातील आहेत. या तरूणानं नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी मीर कासिमवर चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात कासिमचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीची ओळख पटली.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून केवळ ५ तासांत साजिद कुरेशीला अटक केली. या घटनेनंतर मीर कासिमच्या कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT