Maharashtra Political News  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मुंबई महापालिकेतील सेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा

शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena Political Crisis : शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे. शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद हटवत पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने कब्जा केला आहे. आज, राहुल शेवाळे , शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केला आहे. शिंदे गटाने पक्ष कार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद हटवत पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे.

शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर ठाकरे गट आमने सामने आले आहेत. त्यानंतर पक्ष कार्यालयात शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार राडा पाहायला मिळाला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. शिंदे गटाने पालिकेच्या पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर कब्जा केल्यानंतर ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ' आज मुंबई महापालिकेच्या पक्ष कार्यालयात जाऊन आम्ही बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी कार्यालयात प्रवेश करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जय भवानी! जय शिवाजी!, असं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT