Ambarnath Shivsena  Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेच्या महिला आघाडीने वाचला समस्यांचा पाढा; नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

महिला आघाडीने अंबरनाथ नगरपालिकेत धडक दिली.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या (ShivSena) महिला आघाडीने अंबरनाथ नगरपालिकेत धडक दिली. यावेळी अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांचा पाढाच महिला आघाडीने वाचून दाखवला आणि प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरलं. (Ambarnath Shivsena News)

पावसाळा सुरू होताच अंबरनाथ शहरात अनेक समस्यांनी डोकं वर काढलंय. अंबरनाथ शहरात सध्या अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात घडले असून नागरिकांच्या अक्षरशः घरात पावसाचं पाणी जात आहे. तर काही ठिकाणी मोठे नाले तुंबले असून त्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. (Ambarnath Marathi News)

शहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असून त्यामुळं रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सगळ्याविरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर संघटक नीता परदेशी यांच्या नेतृत्त्वाखाली महिला आघाडीने अंबरनाथ नगरपालिकेत धडक दिली.

यावेळी मुख्याधिकारी नसल्यानं अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या दालनात जाऊन महिलांनी समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. या सगळ्यावर पुढील १५ दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी दिलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात वायू प्रदूषणाचा कहर; साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू

Jamun Benefits: तुम्हाला पण जांभूळ खायला फार आवडतात? मग वाचा त्याने शरिराला कोणते फायदे होतात?

Anulom Vilom Benefits: प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास होतात? मग सकाळी १० मिनिटांसाठी करा हे सोपे योगासन

Ratnagiri: बाप्पाचं दर्शन घेऊन बीचवर मज्जा करायला गेले अन् अनर्थ घडला; ५ जणांचा बुडून मृत्यू, नावं आली समोर

Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

SCROLL FOR NEXT