Shiv Sena Symbol Mashaal, Uddhav Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

ShivSena Mashaal Symbol : 'मशाल' चिन्हही जाण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार?

ShivSena Mashaal Symbol News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला तात्पुरतं मिळालेले मशाल चिन्ह अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shiv Sena Symbol Mashaal News: शिवसेना कुणाची आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असतानाच, आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मिळालेलं तात्पुरते चिन्हही जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असल्याचं मानले जात आहे.

शिवसेना कोणाची आणि सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी तूर्तास लांबणीवर पडलेली आहे. शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण याबाबत उद्धव ठाकरेंचा लढा सुरू असतानाच, तात्पुरते चिन्ह मशालही जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिलेले मशाल (Mashaal) चिन्हही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याविरोधात समता पार्टी (Samata Party) सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ठाकरे गटाला समता पार्टीचं मशाल हे चिन्ह दिल्याने मतदार संभ्रमात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला दुसरे चिन्ह दिले जावे, अशी मागणी समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी केली आहे.

समता पार्टीची याचिका फेटाळली होती

याआधीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मशाल चिन्ह दिल्याच्या विरोधात समता पार्टी दिल्ली हायकोर्टात गेली होती. पण ती याचिका फेटाळून लावली होती. समता पार्टीची मान्यता रद्द केल्यानंतर त्यांनी निवडणूक चिन्हावर कोणताही अधिकार सांगितला नाही, असं त्यावेळी नमूद करण्यात आले होते.

सुप्रीम कोर्टात जाणार

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल चिन्ह दिल्याच्या विरोधात समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे. दिल्ली हायकोर्टात आम्ही याचिका केली होती. आता सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. ते चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे, असे समता पार्टीचे अध्यक्ष मंडल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT