uddhav Thackeray Vs Eknath shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena : धनुष्यबाण कुणाचा? तातडीने सुनावणी घेण्यास ठाकरेंचा विरोध; CM शिंदेंनी EC कडे केली होती विनंती

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या तातडीच्या सुनावणीला उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेनेच्या (Shivsena) धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या तातडीच्या सुनावणीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोध दर्शविला आहे. ठाकरे गटाकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी पत्र सादर केलं जाणार आहे. (Shivsena News Today)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना याबाबतचं पत्र पाठवलं होतं.

दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत तातडीने सुनावणी घेण्यास विरोध दर्शविला आहे. जो पर्यंत सर्व कागदपत्रे सादर होत नाही तो पर्यंत सुनावणी घेऊ नये, कागदपत्रांसाठी ४ आठवडे लागणार असल्याची विनंती ठाकरे गटाकडून केली जाणार आहे. (Maharashtra News)

दरम्यान, शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक कॅव्हेट दाखल केले आहे. यामध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये,’ अशी मागणी केली आहे. धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट दावा सांगू शकतो. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी ही खबरदारी घेतल्याचे म्हटले जात आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवेसनेपासून धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेसोबतच राहणार, असा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरच्या प्रशासकीय इमारतीत अस्वच्छतेचा कळस

5 Sweet Foods For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी ५ गोड पदार्थ फायदेशीर; रक्तातील साखर राहील नियंत्रणात

H1N1 flu symptoms: साधा ताप समजून दुर्लक्ष करताय? H1N1 ची ही गंभीर लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

Tingling In Feet : तुमच्या पायांना सतत मुंग्या येतात; 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, असा कराल बचाव?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा? 14,298 पुरुषांना मिळाले ₹1,500; धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT