aaditya thackeray and uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

ठाकरे पिता-पुत्र पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषद घेणार; बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने करणार मोठी घोषणा

आदित्य ठाकरे हे विरोधकांवर जोरदार बरसत आहेत. आता त्यांच्या जोडीला उद्धव ठाकरे देखील दिसणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Shivseana Uddhav Thackeray News : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंपुढे मोठं संकट उभ ठाकलं आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात शिवसेनेचे अनेक मोठे शिलेदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे मोठ्या पेचात सापडले आहेत. या संकटात आमदार आदित्य ठाकरे पक्षाची मोठी कमान सांभाळत आहेत. आदित्य ठाकरे हे विरोधकांवर जोरदार बरसत आहेत. आता त्यांच्या जोडीला उद्धव ठाकरे देखील दिसणार आहेत. (latest Marathi News)

पाच नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे-उद्धव ठाकरे दोन्ही पिता-पुत्र एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. त्या परिषदेत दोन्ही पिता-पुत्र काय घोषणा करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. पाच नोव्हेंबर रोजी महत्वाच्या विषयावर आदित्य-उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिन १७ नोव्हेंबर रोजी आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या इतिहासात पिता-पुत्र पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहे. बंडखोरीनंतर एकत्र पिता-पुत्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे.

उद्धव ठाकरे घेणार पोहरादेवीचे दर्शन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ३ डिसेंबर रोजी पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. बंजारा समाजाच्या मेळाव्यालाही ते यावेळी सहभागी होणार आहेत. यवतमाळमध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात संजय देशमुख यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात आहे. गेल्या महिनाभरात बंजारा समाजातील महंत आणि संजय देशमुख यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात तर ३ डिसेंबर रोजी यवतमाळ जाऊन उद्धव ठाकरे विदर्भात संघटनात्मक ताकद वाढविणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT