shivsena news  saam tv
मुंबई/पुणे

Shivsena : किर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाची कारवाई; पक्षाच्या नेते पदावरून केली हकालपट्टी

ठाकरे गटाने किर्तीकरांवर तातडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Shivsena thackeray Group News : खासदार गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकर यांनी मुंबईत रविंद्र नाट्य मंदिरातील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ठाकरे गटाने किर्तीकरांवर तातडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हकालपट्टी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, सचिव, खासदार विनायक राऊत यांनी पत्रक काढून गजानन किर्तीकर यांच्यावर कारवाई केली. राऊत यांनी पत्रक काढून किर्तीकरांची थेट शिवसेना नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे.

राऊत यांनी पत्रकात म्हटले की, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.

गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली

शिवसेनेच्या ठाकरे गटाची लोक प्रतिनिधींची गळती अद्याप सुरूच आहे. ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT