Shivsena symbol Decision Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena symbol: निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे-शिंदे गट अ‍ॅक्शन मोडवर

उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचं नाव ठरवलं असून त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं आहे.

Jagdish Patil

मुंबई: राज्याच्या आणि शिवसेनेच्या राजकारणाला धक्का बसेल असा निर्णय काल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आयोगाच्या निर्णयानुसार आता शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे.

त्यामुळे आता शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावं शिंदे आणि ठाकरे गट पोटनिवडणुकीत वापरु शकणार नाहीत. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत कोणत्या नावावर दोन्ही गट निवडणूक लढवणार आणि त्यासाठी चिन्ह काय असणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

पाहा व्हिडीओ -

याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे, शिंदे गटांच्या हालचालींना वेग आला असून उद्धव ठाकरे गटाची मातोश्री या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पडणार आहे तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची सायंकाळी ७ वाजता वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडणार असून या बैठकांमध्ये ते काय निर्णय घेणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या गटाचं नाव ठरवलं असून त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहीलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी आपल्या गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असं नाव देण्यात यावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

तर शिंदे गटाने देखील या आधी शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा आपल्या गटाचा उल्लेख केला होता. त्यामुळे ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गट पुन्हा आपणाला देखील शिवसेना बाळासाहेब ठाकरे हेच नाव पाहिजे असा दावा करणार की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT