CM Eknath Shinde, Kolhapur, Ambegoan saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Shivsena News : शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर; पदाधिकाऱ्यांचे सिद्धेश कदमांवर गंभीर आरोप करत राजीनामे

Political News : सिद्धेश कदम यांनी विभाग क्रमांक 2 मध्ये कधीही सक्रीय भूमिका घेतली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : शिवसेना पक्ष फुटीनंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर राज्यभरात इतर पक्षातील कार्यकर्त्यांची शिवसेना पक्षात प्रवेश घेण्यासाठी रांग लागली. मात्र आता मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे.

माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र असलेल्या सिद्धेश रामदास कदम यांच्या मनमानीला कंटाळून विभाग क्रमांक 2 मधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यासंदर्भात विभाग 2 मधील सिद्धेश कदम यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.  (Latest Marathi News)

सिद्धेश कदम यांनी विभाग क्रमांक 2 मध्ये कधीही सक्रीय भूमिका घेतली नाही. तसेच ना कधी मुंबई किवा महाराष्ट्राकरिता त्यांच्या कारकिर्दीत काही भरीव कार्य केलेल्याचे आढळत नाही. आज विभाग क्रमांक 2 शिवसेना पक्षाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे चांगल्या कार्यशील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत होत्या. (Political News)

पण आता गुंड प्रवृतीचे तसेच आरोपी यांना पद देण्याचे काम उस्फुर्तपणे सुरु आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे, तसेच चांगले कार्यकर्ते पक्षापासून दुरावत आहेत. वरिष्ठांकडून पदाधिकाऱ्यांना नीट वागणूक मिळत नाही. त्यामुळे मोठा रोष सर्व पदाधिकान्यांमध्ये आहे.

तसेच सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये विष पेरण्याचे काम सुरु आहे व तसेच महिला पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून शिवीगाळ तसेच महिलांच्या चारित्र्याबद्दल अपशब्द वापरले जातात. हा सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मानाचा विषय आहे, म्हणून या सर्व बाबींना कंटाळून आम्ही सर्व पदाधिकारी पदाचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

SCROLL FOR NEXT