Sanjay Raut Letter to PM Modi  saam tv
मुंबई/पुणे

ED विरोधात राऊतांचे थेट पंतप्रधानांना पत्र, जे सत्य आहे, जो अन्याय आहे त्याला..."

एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वीही देखील एक्झिट पोलचा कसा फज्जा उडाला हे आपण पाहिलं. प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येतं त्याच्यावर आपण मत व्यक्त करणार.

जयश्री मोरे

मुंबई - शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुन्हा पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी ४ वाजता शिवसेना भवन येथे ही (Shiv Sena Bhavan) पत्रकार परिषद पार पाडणार आहे. दरम्यान मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपण ईडीसंदर्भात पंतप्रधानांना १३ पानी पत्र लिहले असल्याची माहिती देखील दिली.

जे सत्य आहे, जो अन्याय आहे त्याला टार्गेट म्हणू नका. समोरच्या काही प्रमुख लोकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे समोर आणले जात आहेत. काही विशिष्ट लोक आमच्यावर हल्ले करतात आणि स्वतः घोटाळे करून नाम निराळे राहतात यांचे मुखवटे फाडले पाहिजे असं संजय राऊत म्हणाले आहेत.(Sanjay Raut Letter to PM Modi)

हे देखील पहा -

ईडी संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे १३ पानांचे पुराव्यासह पत्र दिलं आहे. अनेक पत्रकारांनी ते पत्र मीडियासमोर, देशासमोर ठेवण्याची अग्रह केली. ते पत्र मी आज देणार आहे. त्या पत्रावरून तुम्हाला कळेल की केंद्रीय तपास यंत्रणा किती भ्रष्टाचारने पोखरले आहे कोणाच्या नियंत्रणा खाली काम करतात आणी राजकीय विरोधकांना कोंडी करून अडचणीत आणून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला हातभार लावतात हे सर्व हे टप्प्याटप्प्याने बाहेर येईलआज पहिला भाग बाहेर काढत आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान यावेळी त्यांना एक्झिट पोलसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, एक्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वीही देखील एक्झिट पोलचा कसा फज्जा उडाला हे आपण पाहिलं. प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येतं त्याच्यावर आपण मत व्यक्त करणार. मला अजून देखील खात्री आहे लोकांच्या मनात प्रस्थापितांविरुद्ध राग आणि संताप आहे. ते मतपेटीतून स्पष्ट होताना दिसेल असे देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

SCROLL FOR NEXT