Sanjay Raut on Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Ajit Pawar: अजितदादा येणार... अजितदादा जिंकणार; वज्रमूठ सभेत संजय राऊत काय म्हणाले? वाचा...

Sanjay Raut News: 'हमसे जो टकराएगा, मिट्‌टी में मिल जाएगा', असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Satish Daud

Sanjay Raut Latest Speech: अजित दादा येणार... अजितदादा बोलणार... अजितदादा जिंकणार, असं म्हणत संजय राऊतांना यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल बोलून कलह दूर केला. 'हमसे जो टकराएगा, मिट्‌टी में मिल जाएगा', असा इशारा देत संजय राऊतांना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईच्या बीकेसी मैदानावर आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. या सभेत संजय राऊत यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवाजी पार्कसारखं मोठं मैदान न घेता छोट्या मैदानात वज्रमूठ सभेचं आयोजन केल्यावरून आशिष शेलारांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता. आशिष शेलारांच्या वक्तव्याचा वज्रमूठ सभेत खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. राऊत म्हणाले, अरे आशिष शेलार तुझे डोळे चिनी आहेत, अगदी बारीक. पाहा इथे येऊन, ही गर्दी बघ, कळेल तुला, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

'अमित शहा सभेत येऊन बसले असतील'

काल देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते. आता आहेत की नाही मला माहित नाही. बहुतेक ते सभेत येऊन बसले असतील सभा पाहायला. ही ताकद पाहा ही निष्ठा पाहा आणि आमची वज्रमुठही पाहा, हम सब एक हैं, और एक रहेंगे असंही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे.

'दादा येणार...दादा बोलणार... दादा जिंकणार'

अजितदादा मंचावर बसले आहेत. दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे. सकाळपासून सगळे बोलत होते दादा येणार नाही, आम्ही बोललो अजितदादा येणार... अजितदादा बोलणार... अजितदादा जिंकणार, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. या देशाचा एकमेव पंतप्रधान मी पाहिला, जो ९ वर्ष मन की बात करत आहे, काम की बात करत नाही. पण महाराष्ट्राची वज्रमुठ सभा यापुढे फक्त काम की बात करेल, असंही संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

Apple Maps Privacy: यूजर्ससाठी प्रायव्हसी धोका! Apple Maps तुमचे लोकेशन ट्रॅक करत आहे, 'ही' सेटिंग लगेच बंद करा

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

Bhau Beej 2025: भावाला ओवाळण्यासाठी उद्या कोणता मुहूर्त सर्वोत्तम? आत्ताच नोट करून ठेवा वेळ

SCROLL FOR NEXT