uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Video : देशात हुकूमशाही आली आहे; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

बाहेर गुलामगिरी आहे. देशात हुकूमशाही आली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray News : 'देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे एकत्र येतील. आम्ही त्यांच्यासोबत जाणार. बाहेर गुलामगिरी आहे. देशात हुकूमशाही आली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या 'प्रबोधनकार डॉट कॉम' या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज, रविवारी एकाच मंचावर दिसले.

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून होतो. पण आज दोन पणतू एकत्र आले. आता हा कौटुंबीक कार्यक्रम वाटतोय. काही वर्षांपूर्वी असाच कार्यक्रम कलिनामध्ये झाला होता. तेव्हा रामदास आठवले सोबत होते. प्रकाश आंबेडकर आणि मी अनेकदा बोलतो, भेटतो. पण मंचावर आज आलो'.

'आज दोन पणतू बोलत आहेत. काही आजोबा देखील बोलायला लागले आहेत, असे बोलत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.

'देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी जे एकत्र येतील. आम्ही त्यांच्यासोबत जाणार. बाहेर गुलामगिरी आहे. देशात हुकुमशाही आली आहे. गोमांस सापडलं की मॉब लिचिंग होते. तुरुंगातून बाहेर आलेल्या माणसाला काही जण उमेदवारी देतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर केली.

'केंद्र आणि राज्याला समान अधिकार असायला हवेत. आपल्याकडे आहे का ? सगळंच आपल्याला हवं आहे, अशीही टीका ठाकरेंनी भाजपवर केली. 'न्यायव्यवस्थेवर बोललं की अपमान होतो. लोकशाहीत ३,४,५ स्तंभ असोत, पण सर्व स्तंभ गुलाम बनवणार का ? न्यायव्यवस्थेला देखील गुलाम करणार का? आपण एकत्र येऊन यावर काम केलं पाहिजे', असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT