uddhav thackeray and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

'एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नाही, तर...'; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी 'एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही राज्यातील राजकारण तापलेलंच आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटलेला दिसतोय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यात शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नियमितपणे शिवसैनिकांशी संवाद साधत पक्षाची भूमिका मांडत आहेत. तर दोन्ही नेत्यांनी पक्षावर दावा केल्याने खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांनी 'एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. (Uddhav Thackeray News In Marathi )

जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ४० आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानं पक्षाला मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील ४० आमदार सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. याचबरोबर बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील बैठकांचा सपाटा लावला आहे. उद्धव ठाकरे हे नियमितपणे बैठक घेत शिवसैनिकांशी संवाद आहेत. आजही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्यांना बाळासाहेबांचा फोटो हवा, पण मुलगा नको. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत. हिंमत असेल तर नवा पक्ष काढा. भाजपला शिवसेना संपवायची होती. आमच्या खांद्यावर पाय ठेवून दिल्ली गाठली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT