Uddhav Thackeray News saam tv
मुंबई/पुणे

मुंबई संकटात असताना गिधाड कुठे असतात? उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर जोरदार टीका

मुंबई संकटात असताना गिधाडे कुठे असतात ?, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.

Vishal Gangurde

Uddhav Thackeray News : 'अमित शाह म्हणाले की मुंबईत शिवसेनेला जमीन दाखवू, असे बोलून गेले. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका आल्यावर यांना मुंबई दिसते, मुंबई संकटात असताना गिधाडे कुठे असतात ?, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली.

गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये बोलत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

'दसरा शिवतीर्थावरच होईल. संजय राऊत यांची रिकामी खूर्ची बघितली. त्यावर स्पष्टीकरण देतो की, ते कोणत्याही गटात गेले नाही. संजय राऊत मोडेल पण वाकणार नाही. संजय राऊत हे लढाईत सोबत आहेत. मुले पळवणारी ऐकली आहे. पण आता बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरतेय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

'मुंबईवर गिधाडे फिरू लागली. त्यांना मुंबई गिळायची आहे. तुम्ही गिळून देणार का ? हे नवीन नाही. आम्ही छत्रपतींचा इतिहास वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत. त्यावेळी इतिहासात अनेक शाह स्वराजावर चालून आले होते. त्याच कुळातील अमित शाह, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'अमित शाह हे मुंबईत शिवसेनेला जमीन दाखवूअसे बोलून गेले. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका आल्यावर मुंबई दिसते, त्या मुंबई संकटात असताना गिधाडे कुठे असतात ? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT