gajanan kiritkar and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Shivsena : ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या गळाला लागला; गजानन किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर किर्तीकर यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gajnan Kirtikar News : शिवसेनेच्या ठाकरे गटाची लोक प्रतिनिधींची गळती अद्याप सुरूच आहे. ठाकरे गटाचा आणखी एक खासदार शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

काही दिवसांपूर्वी खासदार गजानन किर्तीकर आजारी होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज, शुक्रवारी गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले. खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात किर्तीकर शिंदे गटात प्रवेश चर्चा करणार अशी चर्चा होती. किर्तीकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाला पूर्णविराम मिळाला आहे. आज, खासदार किर्तीकरांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, माहीम विभागाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरिक सत्कार हा मुंबईतील (Mumbai) रविंद्र नाट्य मंदिर येथे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या भेटीनंतर वर्षा निवासस्थानावरून रवींद्र नाट्य मंदिराच्या दिशेने निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ खासदार गजानन कीर्तीकर यांची देखील गाडी कार्यक्रम स्थळी पोहोचली. या कार्यक्रमात खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात सामील झाले आहेत. या कार्यक्रमावेळी मंतावर खासदार भावना गवळी, शीतल म्हात्रे, विजय शिवतारे उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Maharashtra News Live Update:बारामतीत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन; शारदा प्रांगणात मुक्काम

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT