Raj thackeray  saam tv
मुंबई/पुणे

शर्मिला ठाकरे यांच्या 'त्या' विधानानंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर

"शिवसेनेने साद घातली तर येऊदेत" असं वक्तव्य काल शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर होत्या. त्यांनी काल पुण्यात "गणपती आमचा किंमत तुमची २०२२" या मनसेने केलेल्या आयेजित उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी पत्रकारांनी शर्मिला ठाकरे यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का असा सवाल केला. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी "शिवसेनेने साद घातली तर येऊदेत" असं वक्तव्य केले. यानंतर आजपासून राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत.

उद्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे संबोधित करणार आहेत. उद्या सर्व प्रश्नांना राज ठाकरे उत्तर देणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

अगोदर नेते राज्यभर दौरा करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे स्वतः दौरा करणार आहेत. पक्ष संघटना, आगामी निवडणुका यावर आज चर्चा झाली. उद्या सविस्तर भूमिका मांडणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्यावग स्वत: राज ठाकरे बोलतील असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांनी साद घातली तर एकत्र येऊ देत, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी काल पुण्यात दिली.

शर्मिला ठाकरे यांच्याहस्ते व रिटाताई गुप्ता यांच्या उपस्थितीत "गणपती आमचा किंमत तुमची २०२२" या शहर मनसे आयोजीत उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुण्यात मोती चौक, सोन्या मारुती मंदिराजवळ कार्यक्रम होणार आहे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाल्या, महागाई वाढली हे दिसत नसले तर मंत्री खासदार यांचे भत्ते बंद केले पाहिजेत. कोरोना काळात माजी मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT