शिवसेना मंत्र्यांनी अजितदादांच्या विरोधात वाचला मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचा पाढा - Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना मंत्र्यांनी अजितदादांच्या विरोधात वाचला मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचा पाढा (व्हिडिओ)

राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असूनही सेनेचे मंत्री व आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे

साम टिव्ही

(रश्मी पुराणिक)

मुंबई : राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असूनही सेनेचे मंत्री व आमदारांना पुरेसा निधी मिळत नसल्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाराजी असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. (Shivsena Minister Unhappy about Ajit Pawar)

शिवसेनेचे (Shivsena) नेते व मंत्री यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक पार पडली. त्यात हा तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शिवसेनेला संपवत आहे, अशी भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या बैठकीत विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्री शिवसेनेचे असतानाही मंत्र्यांना व आमदारांना पुरेसा निधी मिळत नाही, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागात उपमुख्यमंत्र्यांनी निधीला कात्री लावली आहे, असाही सूर या बैठकीत उमटल्याचे सांगण्यात आले आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागाला योग्य त्या प्रमाणात निधी मिळावा, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते शिवसेनेच्या विरोधात लढून हरले त्या नेत्यांनाही निधी मिळत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेच्या डोक्यावर बसत असल्याचाही आरोप नेते व मंत्र्यांनी केला.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! 24 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना मृत्यूदंडाची शिक्षा; जगभरात खळबळ

SCROLL FOR NEXT