shivsena mla  saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना आक्रमक; गुवाहाटीला जाणाऱ्या मंत्र्यांचे मंत्रीपद जाणार ?

शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधत गुवाहाटी जाणाऱ्या मंत्र्यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे,असे संकेत संजय राऊत दिले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बहुतांश आमदारांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) त्यांच्यासोबत ५० आमदारांचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडमोडींना वेग आला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने (Shivsena) आज तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली. या बैठकीनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधत गुवाहाटी जाणाऱ्या मंत्र्यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे,असे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. ( Maharashtra political crisis News In Marathi )

बंडानंतर शिवसेनेने आज तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली होती. या बैठकीत महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावात शिवसेनेशी गद्दारी करण्याऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याजवळ असतील. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर दुसऱ्यांना करता येणार नाही.

उद्धव ठाकरे यांच्या पक्ष नेतृत्वावर संशय घेऊ शकत नाही.शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील,अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच बैठकीनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत गुवाहाटी जाणाऱ्या मंत्र्यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे,असे संकेत संजय राऊत दिले आहेत. त्यांच्या मंत्रीपदावर आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढलं

राज्यातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नेतेपद काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास ४० हून अधिक आमदारांसह बंड केल्याने शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केल्यानंतर शिंदे यांनी बंड सुरूच ठेवलं आहे. अशातच शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने आज तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या पाटोदा तालुक्यात अवकाळीने जांभूळ व केळी पिकांचं प्रचंड नुकसान

Suvarnadurga Fort : मराठ्यांच्या सागरी सामर्थ्याचे सुवर्ण प्रतीक! सुवर्णदुर्ग किल्ल्याचे जुने नाव काय?

Diabetes Risk: या 6 सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, वेळीच व्हा सावध

Snake Eggs: घराजवळ किंवा बागेत दिसलेली अंडी सापाची की पक्ष्याची? 'या' सोप्या पद्धतीने ओळखा फरक; चुकूनही 'ही' चूक करू नका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹६००० जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT