PM Modi - Eknath shinde Saam Digital
मुंबई/पुणे

Shivsena Leader on BJP: 'आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे', शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याचं मोठं वक्तव्य

Shivsena Leader on BJP: खासदार गजाजन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबच्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News:  भाजप आणि शिवसेनेते मतभेत निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबच्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही शिवसेनेत आलो आहोत. आम्ही आता एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे आमची देखील कामं झाली पाहिजेत. मात्र घटक पक्षाला सापत्न वागणूक मिळत असल्याचं मोठं वक्तव्य गजाजन किर्तीकर यांनी केलं आहे.

दोन दिवसापूर्वी शिंदे गटातील खासदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. यावर खासदारांनी आपले प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडले. आम्हाला अधिक निधी आणि समान वागणूक मिळाली पाहिजे, अशी मागणी गजानन किर्तीकर यांनी केली. (Latest News Update)

ज्यावेळी सत्तासंघर्ष झाला त्यावेळी आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. याठिकाणी भाजप आणि आम्ही एकत्र मिळून आमचं सरकार आहे. त्यामुळे आता आम्ही NDA चा भाग आहोत. (Political News)

अगोदर महाविकास आघाडीमध्ये असल्याने एनडीएचा भाग नव्हतो. मग आता आमची कामं झाली पाहिजे. मात्र येथे आम्हाला सापत्न वागणूक मिळते, अशी नाराजी गजानन कीर्तिकर यांनी दर्शवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Addiction: जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी दिला ईशारा

Maharashtra Live News Update: दत्ता बहिरट यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Shocking : भाच्याची गर्लफ्रेंड प्रेमात, अनैतिक संबंध अन् हत्येची सुपारी; मामाच्या भयंकर कृत्याने शहरात खळबळ

उमेदवारी अर्ज भरताना भावी नगरसेवकाने आणली 5 हजार रुपयांची चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची काही वेळासाठी दमछाक|VIDEO

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT