devendra Fadnavis
devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : "सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत"

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात नवीन सरकार आलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.

त्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाकडून जोर धरू लागली. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) यांनी एक मोठं विधान केले केला आहे. हे सरकार पडणार म्हणून भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा मोठा दावा खैरे यांनी केला आहे. (Aurangabad Latest News)

देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे त्यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत अशी खोचक टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. छगन भुजबळ, नारायण राणे पडले होते. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार. फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व ४० आमदारांचा पराभव होईल असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं चंद्रकांत खैरे यावेळी सांगायला विसरले नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

Today's Marathi News Live: सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

Akola News: मंदिरासाठी खोदकाम करताना जमिनीत आढळली २०० वर्षांपेक्षा जुनी इमारत; भिंतींवर होता 'राम' नामाचा उल्लेख

Akola Crime News : अकोल्यात गुरूच्या नात्याला कलंक; कुस्ती प्रशिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

SCROLL FOR NEXT