Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचेत; संजय राऊतांचा हल्लाबोल

भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठी शिवसेना फोडण्याचे काम सुरू आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली.

अचानक काही खासदारांच्या घरावर पोलिसांचा चौकी पहारा लागला आहे. पोलीस बळाचा वापर होत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर सध्या सुरू आहे. पण असुदे कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला बाळासाहेबांची शिवसेना तयार आहे, अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिली.

लढाई कोणतीही असुद्या चिन्हाची असो नाहीतर निवडणुकीची असो आम्ही समर्थ आहोत. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यासाठी शिवसेना फोडण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे शिवसेनेची (ShivSena) ताकद कमी होणार नाही. आमदार, खासदार ही शिवसेनेची ताकद नाही. शिवसेनेची ताकद रस्त्यावर आहे. भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात आमदार, खासदारांच्या घरासमोर पोलिसांचा पहारा वाढवला आहे. ज्यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा आहे, त्यांना सभागृहात येण्याचे अवघड करु, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. एकनाथ शिंदे हे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. ते आज दिल्लीत आले आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी फायदेशीर 3 फळे; रोजच खाल्ली तर होईल फायदा

Maharashtra News Live Update: संसद मार्ग पोलीस स्टेशन बाहेर राहुल गांधी यांचं आंदोलन

Famous Singer Death : प्रसिद्ध गायिकेचं निधन, संगीत विश्वावर शोककळा

Accident: मॉलमध्ये मोठी दुर्घटना, शटरिंग अंगावर पडलं; ३ जणांचा जागीच मृत्यू

New Cancer therapy: आता पुन्हा कॅन्सर होण्याची चिंता मिटणार? तज्ज्ञांनी शोधणी नवी थेरपी, शरीरात असं करेल काम!

SCROLL FOR NEXT