uddhav thackeray And eknath Shinde, Eknath News Update, Uddhav Thackeray News, maharashtra news today live saam tv
मुंबई/पुणे

शिवसेनेचं ठरलं! शिंदे गटाला देणार धक्का; उद्धव ठाकरेंनी आखली नवी रणनीती

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता शिवसेना पुन्हा मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना (Shivsena) गणेशोत्सवानंतर राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेने यात्रेला सुरूवात होणार आहे. ठाण्यातील टेंभी नाक्यावर ठाकरे यांच्या सभा होणार आहे.

महाप्रबोधन यात्रेची सुरुवात आणि सांगता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे. यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनीही राज्यभरात दौरा करत बंडखोर आमदारांच्या मतदार संघात सभा घेतल्या. यावेळी शिवसेनेने शक्ती प्रदर्शन केले आहे. आता पुन्हा शिवसेनेने दौरा सुरू केला आहे. त्यामुळे आता पुन्हा शिंदे गट (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमने सामने येणार आहे.

४० आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेने या ४० आमदारांविरोधात उच्चन्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आमदारांनी पक्षाविरोधात केलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी या याचिकेत मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasuni Khakhra: घरीच १० मिनिटांत बनवा चटपटीत लसूणी खाखरा, चहाची चव वाढवेल

भाजपच्या उमेदवाराला अडवल्याने केंद्रीय मंत्री आणि पोलिसांमध्ये बाचाबाची|VIDEO

High BP: उच्च रक्तदाब हळूहळू शरीराला पोखरतो; प्रवासात हार्ट अटॅकचा धोका वाढवणाऱ्या ४ घातक सवयी जाणून घ्या

Maharashtra Nagar Parishad Live : बोगस मतदान करताना चार-पाच जणांना पकडलं, बुलडाण्यात गोंधळ

Maharashtra Live News Update: कागल नगरपालिका मतदान केंद्रावर गोंधळ

SCROLL FOR NEXT