डोंबिवली - पूरग्रस्तांना (Flood Victims) सर्वच जण मदत करत आहेत. यात सर्वच नागरिक, समाजिक कार्यकर्ते, संस्था आणि पक्ष पुढाकार घेत आहेत. यात मनसे (MNS) पक्षाने ''मदत नव्हे सेवा'' या टॅग लाईन वापर करत पूरग्रस्तांची सेवा करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे शिवसेनेने (Shivsena) सुद्धा अशाच टॅग लाईनचा (Tagline) वापर केला आहे. (shivsena helping flood victims with new tagline)
मदत नव्हे सेवा या मनसेच्या टॅग लाईन नंतर आता शिवसेनेसुद्धा टॅग लाईन तयार केली आहे, ती म्हणजे ''मदत नव्हे, कर्तव्य.'' या हॅशटॅगचा वापर करत शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आणि डोंबिवलीचे रहिवासी भाऊसाहेब चौधरी यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
हे देखील पहा -
काय म्हणाले भाऊसाहेब चौधरी?
#मदतनव्हेकर्तव्य हा हॅशटॅग वापरत त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की,
कोकणात पूरग्रस्त बांधवांना आधार देण्यासाठी सुमारे १० ट्रक #अन्नधान्य व #गृहउपयोगी_साहित्य #चिपळूणसाठी रवाना करण्यात आले. साहित्य घेऊन निघालेल्या वाहनांना #सामना कार्यालय प्रभादेवी येथून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भगवा झेंडा दाखवून रवाना केले. याप्रसंगी माझ्या समवेत जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम, धुळे नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.