Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

ना प्रतिक्रिया, ना ट्विट, देवेंद्र फडणवीस नेमके आहेत कुठे? राजकीय वर्तुळात चर्चा

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आज सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. अशातच भाजप (BJP) नेत्यांनी दिल्लीमधील आपल्या हालचाली वाढवल्या आहे. मात्र यादरम्यान चर्चा होतेय ती भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची. राज्यात मोठ्या घडामोडी घडत असताना फडणवीस नेमके कुठे आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Devendra Fadanvis Eknath Shinde Latest News)

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी दिल्लीत जाणार होते अशी चर्चा होती. दिल्लीत गेल्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इतकंच नाही तर, फडणवीस हे गुजरातमध्ये देखील जाणार असल्याची चर्चा होती. मात्र अद्यापही देवेंद्र फडणवीस हे गुजरातमध्ये गेली असल्याची माहिती कुठूनही समोर आली नाही. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्येच आहे.

विशेष बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनत बंड केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही प्रतिक्रिया किंवा कुठलंही ट्विट केलेलं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमकं चाललं आहे? देवेंद्र फडणवीस नेमके कुठे आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतील शिवसेनाबाहेर सेना कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून 'एकनाथ शिंदेंचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय' अशा घोषणाबाजी करण्यात येत आहेत. (Eknath Shinde Latest News)

एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाल्यानंतर विविध पक्षाचे नेते ठाकरे सरकारला लक्ष करत आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचलं आहे , त्यांनी ट्वीट करत, 21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’ तला शेवटचा दिवस असे म्हटलं आहे. दरम्यान, पुढील 24 तास ठाकरे सरकारसाठी वैऱ्याचे आहेत. त्यामुळे रात्री बैठकांवर बैठका होण्याची शक्यता असून या बैठकांमध्ये काय तोडगा निघतो याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

कनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाबाबत शिवसेना काय निर्णय घेतेय? आणि शिंदे यांचे बंड थोपवण्यास यशस्वी होते का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT