Eknath Shinde Deepali Sayyad Saam TV
मुंबई/पुणे

Deepali Sayyed : ठाकरे गटाला आणखी एक धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

साम टिव्ही ब्युरो

Deepali Sayyed : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसेंदिवस ठाकरे गटातील नेते तसेच पदाधिकारी शिंदे गटात (Eknath Shinde)  प्रवेश करत आहेत. आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. स्वत: दीपाली सय्यद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल, असं दीपाली सय्यद यांनी सांगितलं आहे. Maharashtra Politics)

शिवसेना (Shivsena) नेत्या दीपाली सय्यद काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महत्वाची बाब म्हणजे, शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्याची मागणी करणाऱ्या दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुष्मा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

सतत खोके-खोके म्हटलं जात आहे सगळीकडे, खोक्यांचं खरं राजकारण काय आहे हे लोकांना कळायला पाहिजे. आणि त्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत हे देखील कळलं पाहीजे. मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात आहे तेही कळलं पाहिजे, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांच्या अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेचे खोके मातोश्रीवर येणं बंद झाले असल्याची खंत झाली आहे, असा टोलाही दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.

दीपाली सय्यद या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालीच नाही. त्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अखेर शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली.

एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. त्यामुळं या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. शनिवारपर्यंत माझा शिंदे गटात प्रवेश होणार, असंही दीपाली सय्यद यांनी जाहीर केलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

Marathi Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, विवाह सोहळ्यातील खास VIDEO आला समोर

Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT