Shivaji PArk Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोण मारणार? १० ऑक्टोबरपर्यंत BMC घेणार निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे

Mumbai News :

दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कुणाचं? याचा निर्णय येत्या १० ऑक्टोबरपर्यंत महापालिका प्रशासन घेणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच महापालिका निर्णय घेण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. दसरा मेळावा तोंडावर आला असताना मुंबई महापालिकेसमोर शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याकरता परवानगी कुणाला द्यायची हा पेच निर्माण झाला आहे. (Latest Marathi News)

ठाकरे आणि शिंदे गट या दोघांकडूनही दसरा मेळावा करता शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठीचे अर्ज पालिकेकडे यापूर्वीच दाखल झाले आहेत. तयारीकरता वेळ कमी असल्यानं लवकरात लवकर महापालिकेनं निर्णय घ्यावा ही मागणी ठाकरे गटाने केली आहे.

महापालिका मैदानाची परवानगी देण्यासंदर्भात सावध भूमिकेत आहे. मात्र यावेळी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास ठाकरे गटाला आहे. तर आमचा हक्क आम्ही सोडणार नाही. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कावरच होणार, असा दावा शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार संजय गायकवाड यांनी केला आहे. (Political News)

त्यामुळे ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांचा शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं असा आग्रह आहे. मागच्या वर्षी शिंदे गटाने बीकेसी येथे आपली दसरा मेळाव्याची सभा घेतली होती. मात्र विविध विकासकामं सुरु असल्याने यावर्षी बीकेसी येथे मोठ्या सभेचं आयोजन करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT