Shivsena 16 Mla Disqualification Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar preparing to take a big decision  Saam Tv
मुंबई/पुणे

Shivsena 16 Mla Disqualification: १६ आमदार अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट; विधानसभा अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Shivsena 16 Mla Disqualification Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena 16 Mla Disqualification Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीशीवर उत्तर देण्यासाठी ७ दिवसांचा वेळ देण्यात आला होता.

आता दोन्ही गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या (Eknath Shinde) ४० आणि उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे.

दोन्ही गटाकडून वेगवेगळा दावा सुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे आता १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आम्ही १४ आमदार खरी शिवसेना आहोत, असा दावा ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) करण्यात आला आहे. ठाकरे गटाने अध्यक्षांकडे २६२ पानांचं उत्तर सादर करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४ आमदारांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन केलं आहे.

पक्षाची घटना मोडून शिंदे गटाने अनधिकृतरित्या पक्षावर दावा केला. २०१८ मध्ये सुनील प्रभूंचा व्हीप लागू होता. तसेच राजकीय पक्षाचाच व्हीप लागू होणार, कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालात तसा उल्लेख आहे, असं स्पष्ट उत्तर ठाकरे गटाच्या आमदारांनी दिलं आहे.

आता दोन्ही गटांनी लेखी उत्तर सादर केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता आमदार अपात्रतेसंदर्भातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Maharashtra News Live Update: इगतपुरी पर्यटक मारहाण प्रकरणी नऊ आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT