maval, pune banglore highway, saam tv
मुंबई/पुणे

शिवसेना अंगार हैै...! टायर पेटवून शिवसैनिकांनी राेखून धरला महामार्ग

आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत शिवसैनिक आंदाेलनाच्या पवित्र्यात आहेत.

दिलीप कांबळे

मावळ : शिवसेना (shivsena) अंगार है...बाकी सब भंगार है....उद्धवजी ठाकरे आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा देत शिवसैनिकांनी (shivsainik) आज (गुरुवार) पुणे बंगळूर महामार्गावरील साेमटाणे फाटा येथे रास्ता राेकाे आंदाेलन केले. (shivsena latest marathi news)

बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. स्वपक्षीय आमदार फुटल्यामूळे उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि मविआ (mva) सरकार कोसळले.

या घटनेमुळे राज्यातील शिवसैनिकांत प्रचंड राेष निर्माण झाला आहे. बंडखाेर शिवसैनिकांचा निषेध म्हणून मावळ शिवसेनेच्या वतीने आज जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सकाळी टायर जाळून रस्ता अड़विण्यात आला.

शिवसेना मावळच्या वतीने कार्यकर्त्यांनी सोमटणे फाटा येथे रास्ता राेकाे आंदोलन केले. मविआ सरकार कोसळल्यानंतर मावळ शिवसेना आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise For Healthy Heart: हेल्दी हार्टसाठी रोज किती वेळ व्यायाम केला पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर मतदार यादीत उद्धव ठाकरेंच्या नावावर आक्षेपार्ह मजकूर? ठाकरे गटाची तक्रार

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

SCROLL FOR NEXT