Shivajirao Adhalrao Patil Saam TV
मुंबई/पुणे

वेदांता प्रकल्पावरुन आढळराव पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, उद्योगपतींना मारण्याचा कट रचता अन्...

राज्यात येणारे उद्योग राज्याबाहेर जात असताना विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.

रोहिदास गाडगे

पुणे: राज्यात येणारे उद्योग राज्याबाहेर जात असताना विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adahalrao Patil) यांनी उडी घेतली आहे.

एका बाजुला उद्योग आणि रोजगार राज्यात येण्याची अपेक्षा व्यक्त करता आणि दुसऱ्या बाजुला उद्योगपतींना मारण्यासाठीचे कट कारस्थान रचण्याचा दुदैवी प्रकार केला गेल्याचा गंभीर आरोप करत आढळराव पाटील यांनी थेट ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

राज्यात येणारा वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. प्रकल्पाच्या मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. मोदींच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला नेला असून या गोष्टीला शिंदे सरकार विरोध करत नाही.

पाहा व्हिडीओ -

राज्याच्या तोंडचा घास पळवला तरी यांना काही वाटतं नाही असा आरोप राज्य सरकारवर केला जात आहे. याच सर्व प्रकरणावरुन आता आढळराव पाटलांनी मागील सरकारवर टीका केली आहे.

राज्यात उद्योगपतींना मारण्याचे कट रचले जात असतील तर राज्यात प्रकल्प कसे येतील असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते पुढे म्हणाले, सेमी कंन्डक्टर बनविणाऱ्या देशातील 10 उद्योजकांपैकी मी एक मोठा उद्योजक असल्याचा दाखला देत आढळराव पाटलांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली, राज्यात काही कंपन्या याव्यात यासाठी काही कंपन्या सुचवल्याचा गौप्यस्फोट करत सरकारच्या वेळकाढुपणामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेलेत.

एका बाजुला राज्यात उद्योग उभे रहावे उद्योग यायला हवेत असं बोलता अन् दुसऱ्या बाजुला जगातल्या नामवंत उद्योगपतींच्या घराखाली स्फोटकांची गाडी ठेवता हा दुदैवी प्रकार असल्याचे सांगत आढळराव पाटील यांनी मागील ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

SCROLL FOR NEXT