शिवसेना 'त्या' अनाथ बालकाला दत्तक घेणार - किशोरी पेडणेकर  Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेना 'त्या' अनाथ बालकाला दत्तक घेणार - किशोरी पेडणेकर

बाळ वाचविण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न सुरु आहेत

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

रामनाथ दवणे

मुंबई : वरळी (Worli) बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या महिलेचाही कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार महिन्याच्या बालकासह माता-पित्यांचाही मृत्यू झाला आहे. तर, या कुटुंबातील विष्णू पुरी पाच वर्षीय मुलावर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि पाच वर्षीय वाचलेल्या मुलाचे पालन स्वतः महापौर करणार असे यावेळी त्यांनी सांगितले.

हे देखील पहा-

महापौर ते बाळ दत्तक घेणार आहेत आणि ते बाळ वाचविण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न सुरु आहेत असे सांगितलं. पुढे त्या म्हणाला, स्फोट झाल्याचे कळताच क्षणी शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यात आलं. पोद्दारला उपचार होणं शक्य नव्हतं. अॅम्ब्युलन्स खरं तर कस्तुरबालाच येणं आवश्यक होतं मात्र, नायरला अॅम्ब्युलन्स गेली.

नायर रुग्णालयातील २ डॉक्टर, नर्स निलंबित;

तेथे काही प्रमाणात उपचाराला उशीर झाला, असंवेदनशिलता दिसली त्यामुळे २ डॉक्टर आणि एका नर्सला तातडीनं निलंबीत केलं. वडील नायरहॉस्पिचलमध्येच क्रिटीकल कंडीशन मध्ये होते. महापौरांनी माहिती दिली कि, घटनेतील आईला ५६ टक्के भाजलं होतं. जे बाळ वाचलंय त्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती दिली.

नितेश राणेंना एवढं का सिरीयस घेताय?

आज भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे एका कुटुंबाचा बळी गेला आहे. आता मुंबईचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जरा लाज उरली असेल तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असं नितेश राणे म्हणाले. याविषयी त्या म्हणाल्या, नितेश राणेंना एवढं का सिरीयस घेताय. त्यांच्या म्हणण्याला काही बेस नाही. फक्त राजकारणासाठी दिसत राहायचं आणि बोलत राहायचं. यांच्यापैकी कोणी अॅम्ब्युलन्स तरी पाठवली का?

शिवसैनिक, कार्यकर्ते सुरुवातीला मदतीला धावले. गॅस सिलींडर आता बंद होऊन धोका कमी असलेल्या पाईप गॅस चा अवलंब जास्तीत जास्त होईल अश्या योजना आणाव्यात. त्यांनी प्रार्थना केली, सिद्धीविवायकाला, मुंबादेवीला, दर्ग्यात, सर्व धर्मियांच्या देवस्थांनात प्रार्थना करते हे बाळ वाचु दे. हे बाळ आम्ही दत्तक घेतलंय. शिवसेना या अनाथ बालकाची आई-बाप होईल असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT