Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest Update SAAM TV
मुंबई/पुणे

Andheri By-Election : CM शिंदेंचा मोठा प्लॅन; थेट ठाकरेंचा उमेदवारच फोडणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे (Eknath Shinde) उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri By-Election) शिंदे हे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या आपल्या गटात याव्यात यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर ऋतुजा लटके शिंदे गटात दाखल झाल्या तर हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असेल. (Eknath Shinde News Today)

निवडणूक आयोगाकडून शिंदे आणि ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह आणि नाव मिळाल्यावर दोघांकडून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणुकीत आपल्याच उमेदवार विजयी व्हावा यासाठी दोन्ही गटांकडून रणनिती आखण्यात येत आहे. अशातच, शिंदे गटाकडून आता नवी खेळी खेळली जात असून ठाकरे गटाचा उमेदवार आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Latest Marathi News)

ऋतुजा लटके करणार होत्या शिंदे गटात प्रवेश?

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या शिंदे गटात प्रवेश करणार होत्या, अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार मुर्जी पटेल यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी लटके यांनी केली होती. मात्र, मुर्जी पटेल यांनी कोट्यवधीखर्च केल्यामुळे मी माघार घेणार नाही असा संदेश पक्षश्रेष्ठींना दिला त्यामुळेच लटके यांनी शिंदे गटात आल्या नाहीत. (Maharashtra News)

दरम्यान, मुर्जी पटेल हे पुन्हा अपक्ष म्हणून उभे राहिले तर आपल्याला मोठा फटका बसेल अशी चिंता भाजपला लागून होती. त्यामुळेच लटके यांना शिंदे गटात प्रवेश दिला गेला नाही. अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. जर मुर्जी पटेल यांनी पाठिंबा दिला तर लटके या शिंदे गटात जाणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

धनुष्यबाण आम्हालाच मिळणार : CM शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत एक मोठं विधान केलंय. मेरीटनुसार धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळणार असा दावा शिंदेंनी केला आहे. याशिवाय ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) शिंदेंनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असा उल्लेखही केला.

'55 पैकी 40 आमदार हे आमच्यासोबत आहेत. त्यांच्या मतांची आकडेवारी 39 लाख होते. तसेच 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत आहे त्यांच्या मतांची आकडेवारी 69 लाख, म्हणजे 70 टक्क्यांपेक्षा जास्त संख्याबळ आमच्याकडे त्यामुळे मेरीटनुसार, धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे आणि तो मिळेलच', असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT