Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Case : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना विचारले 5 महत्वाचे प्रश्न

Badlapur News Today : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना 5 मोठे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

Satish Daud

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर एका सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून बदलापुरातील घटनेवर भाष्य करण्यात आलंय. ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय ही मंडळी उठताबसता घेत आहे. हे सरकार भगिनींना पैसे तर देत आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय? ती कधी देणार? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केलाय.

शिंदे–फडणवीसांच्या राज्यात ‘लाडक्या बहिणीं’च्या ‘लाडक्या लेकी’देखील सुरक्षित नाहीत, अशी टीका देखील सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना 5 मोठे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

बदलापुरातील घटनेवर ठाकरे गटाचे 5 प्रश्न

अत्याचारग्रस्त चिमुरडय़ांच्या पालकांना पोलीस ठाण्यात 11-12 तास रखडवून ठेवण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तब्बल 12 तासांनंतर सुरू केली गेली. हा विलंब कशासाठी करण्यात आला? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला.

"गुन्ह्यासाठी विलंब कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला गेला? ज्या शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. मग येथेही ‘निबंध’ लिहून घेऊन कोणाला सोडून देण्याचा विचार होता का? त्यासाठी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला गेला का?" असे प्रश्नही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आले.

"गृहमंत्री फडणवीस म्हणत आहेत की, दिरंगाई झाली असेल तर कारवाई करू. पालकांना बसवून ठेवलं असेल तर कारवाई करू. तक्रार नोंदवण्यास 12 तास काय आहे? तरीही गृहमंत्रीच जर आणि तरची भाषा करीत आहेत. ती दिरंगाई करणाऱ्यांच्याच पथ्यावर पडणारी आहे", अशी टीकाही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली.

"बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये, असे श्रीमान फडणवीस म्हणाले. मुळात तुमच्या अखत्यारीतील यंत्रणेने वेळकाढूपणा केला आणि पीडित पालकांना वेळेवर न्याय दिला नाही म्हणूनच बदलापुरात निषेधाचा, संतापाचा वणवा पेटला. हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरले. त्यात ना विरोधी पक्ष होते ना राजकारण. आणि अन्याय-अत्याचार पीडितांना न्याय मिळावा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी नाही तर कोणी घ्यायची?", असा सवालही सामना अग्रलेखातून फडणवीसांना विचारण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT