Sanjay Raut News Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी, तर कुणाला २ एकर जमिनी वाटल्या; संजय राऊतांचा आरोप

Satish Daud

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत अखेर महायुतीने बाजी मारली. महाविकास आघाडीतील आमदारांच्या फाटाफूटीमुळे महायुतीचे सर्वच ९ उमेदवार विजयी झाले. परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने समर्थन दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, आमदारांची फाटाफूट आणि घोडेबाजारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आम्हाला कोणताही पराभवाचा धक्का बसलेला नाही. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही आमदार फुटलेले नाही. काँग्रेसचे ते ७ जण केवळ कागदावर काँग्रेससोबत होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. फुटीर आमदारांना काल शेअर मार्केटसारखा भाव होता. काहींना २५ कोटी रुपये वाटले. तर काही आमदारांना प्रत्येकी २ एकर जमिनी देखील वाटल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

"शिवसेनेकडे (ठाकरे गट) केवळ १५ मतं असतानाही आमचे उमेदवार मिलिंद नार्वेकर निवडून आले. शेकापचे जयंत पाटील सुद्धा निवडून आले असते, पण गणित जुळलं नाही. आम्ही सर्वांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. पण जयंत पाटलांकडे स्वतःच्या पक्षाचे मत नव्हते. शरद पवार यांनीही जयंत पाटलांसाठी प्रामाणिकपणे काम केलं. ते आमच्या महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग आहेत", असं राऊत म्हणाले.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे खासदार नारायण राणे यांच्याविरोधात विनायक राऊत यांनी कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "निवडणुकीवेळी पैशांचं वाटप झालं, काही लाख मते विकत घेण्यात आली, याबाबतचे सगळे पुरावे आमच्या हातात आहेत. म्हणूनच विनायक राऊत यांनी कोर्टात धाव घेतल्याचं संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT