Sanjay Raut News SAAM TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार, काय आहे नेमकं प्रकरण?

संजय राऊत यांना कोर्टानं समन्स बजावले असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut News : मुंबईतील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात काही दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर पुन्हा अटकेची टांगती तलवार आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावले आहेत. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात भाषण केल्याप्रकरणी राऊत यांना हे समन्स बजावले आहे.

गोरेगाव येथील कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत हे तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, आता आणखी एका प्रकरणात संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ३० मार्च २०१८ रोजी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टानं त्यांना समन्स बजावले आहे.  (Latest Marathi News)

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बेळगावात प्रक्षोभक भाषण केले होते. त्यामुळे राऊत यांना समन्स बजावले आहे. १ डिसेंबर रोजी त्यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संजय राऊत हे स्वतः १ तारखेला कोर्टात हजर राहणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना नेहमी सीमावर्ती भागातल्या नागरिकांना पाठिंबा देत आहे. 2018 मध्ये मी बेळगावला गेलो होतो. भाषण केलं होतं. आता वॉरंट काढलंय. ही क्रोनोलॉजी समजून घ्या. कोर्टाचा आदेश आहे तर सन्मान करणारच. मी जाणार. मला अटक केली तरी चालेल. या प्रकरणावर शिवसेना कधीच तडजोड करणार नाही. मला मारलं तरी चालेल. मी जाईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT