Sanjay Raut Todays news  Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! राऊतांना घेऊन ईडीचं पथक जे.जे रुग्णालयाकडे रवाना; वैद्यकीय तपासणी होणार

संजय राऊत यांना जेल की बेल हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात ईडीने रविवारी रात्री अटक केली. दरम्यान, आज त्यांना घेऊन ईडीचे पथक जे.जे रुग्णालयाकडे रवाना झालं आहे. राऊत यांची जे.जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. कदाचित तपासणी झाल्यानंतर राऊत यांना थेट न्यायालयात नेलं जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना जेल की बेल हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे. (Sanjay Raut Latest News)

संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल 15 तासांच्या चौकशीनंतर ईडीने रविवारी रात्री राऊतांना ताब्यात घेतलं आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी ईडीने राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त देखील जप्त केली आहे. दरम्यान, अटक झाल्यानंतर आज त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या जे.जे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना थेट ईडीच्या कोर्टात नेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राऊतांना आज जेल मिळणार की बेल हे काही वेळातच स्पष्ट होईल.

राऊत म्हणाले..., 'झुकेगा नही'

ईडीची धाड पडल्यानंतर अटक होणार असल्याची राऊत यांना कुणकुण लागली होती. यावेळी त्यांनी झुकणार नाही, असं ट्विट केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं ते म्हणाले होते. आजही जेजे रुग्णालयात आणल्यावर त्यांनी महाराष्ट्रात काय चाललंय हे आपण पाहतच आहात. पण आम्ही झुकणार नाही, असं राऊत म्हणाले.

राऊतांविषयी केलेलं राज ठाकरेंचं ते भाकीत खरं ठरणार?

संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं एक जुनं विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झालं आहे. संजय राऊत यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं भाकीत राज ठाकरे यांनी केलं होतं. मार्च महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका कार्यालयाच्या उद्घाटनला दिवा शहरात आले होते.

यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली होती. 'आमचं राजकारण मिमिक्रीवर चालत नाही', असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर 'आता त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी,' असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं होतं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

MI vs CSK: दुखापत सँटनरच्या खांद्याला, तरीही शार्दुल कसा खेळला? मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर

Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

डोंबिवलीत स्टंटबाजांचा कहर! बाईकवर उभा राहून तरुणाचा जीवघेणा स्टंट, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT