Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका होणार? जामीन अर्जावर आज सुनावणी

संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut News : पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे ईडीकडून आज राऊतांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होईल. त्यामुळे राऊतांना (Sanjay Raut) बेल मिळणार की पुन्हा जेलमध्ये जावं लागणार याबाबत आज निर्णय होईल. (Sanjay Raut News Today)

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात शुक्रवारी ईडीने आरोपपत्र दाखल केलं होतं. याप्रकरणीही आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.

काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लगेच राऊत यांनी जामिनीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.पत्राचाळ हा म्हाडाचा भूखंड आहे. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडा व भाडेकरुंची दिशाभूल करुन यातील अनेक भाग हा खासगी कंत्राटदारांना दिला. तसेच त्यातील 25 टक्के शेअर्स हे एचडीआयएलला विकले. (Shivsena Sanjay Raut News)

या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. संजय राऊत यांना ईडीने 1 ऑगस्ट रोजी पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती.

Edited By -Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नालासोपा-यात मुख्य रस्त्यावरील उघड्या गटारात पडला पादचारी नागरिक

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

फक्त ‘अब्बा-अम्मा’ म्हणणाऱ्या बालकाला पोलिसांनी ९० मिनिटांत पोहोचवलं आई-वडिलांकडे

SCROLL FOR NEXT