Shiv Sena-MNS Twitter War Saam Tv
मुंबई/पुणे

Shiv Sena-MNS Twitter War:...बेगाने शादी मे "राजू चाचा "दिवाना; शिवसेना युवा सेना सचिवांचे प्रतिउत्तर

Bharat Jadhav

(अभिजीत देशमुख)

Shiv Sena-MNS Twitter War:

शिवसेना आणि मनसेमध्ये विकासकामांवरून ट्विटर वॉर सुरू झाले आहे. कधी मोठा गाव मानकोली पूल ,कधी विकासकामावरून या दोन्ही पक्षामध्ये ट्विटर वॉर होत असतात. आता दोन्ही पक्ष मोठागाव खाडी किनारी सुरू असलेल्या भरणीवरून आमने-सामने आलेत. डोंबिवली पूर्वेकडील मोठा गाव खाडी किनारी असलेल्या खारफुटीवर भरणी सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.(Latest News)

यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी ही भरणी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत शासनाकडे तक्रारी केली. मात्र शासनाकडे वारंवार तक्रार करून देखील काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप केला. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटमध्ये या परिसराचा व्हिडिओ अपलोड केलाय. यात महसूल पालिका आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून डोंबिवली मोठा गाव येथे दिवसाढवळ्या खारफुटी जागेवर झाडे तोडून मातीचा भरावा केला जात आहे. यात कोणत्याही प्रकारची रॉयल्टी भरली जात नाही, असा आरोप केला. शासनाने याकडे लक्ष देईल, का असा सवालही त्यांनी आरोप करताना केलाय.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या ट्विटनंतर शिवसेनेने त्यांना प्रतिउत्तर दिलंय. या जागेवर नागरिकांच्या सुविधेसाठी नेचर पार्क उभारण्यात येणार आहे. यासाठी पर्यावरण विभागाचा निधी मंजूर असून तेच काम सुरू आहे. उगाच कुणी गैरसमज पसरवू नये ,असे उत्तर शिवसेना युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी दिले.

Raju Patil

डोंबिवली मोठा गावात नेचर पार्क उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पण त्यांना फक्त भरणी दिसते. बेगाने शादी मे राजू चाचा दिवाना असे उपहासात्मक ट्विट म्हात्रे यांनी केले आहे. एकीकडे डोंबिवली मोठा गाव परिसरातील या भरणीच्या कामावरून पुन्हा एकदा शिवसेना मनसेमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या सोशल मीडियावरील वॉरमुळे नेटिझनची मात्र चांगलीच करमणूक होतेय.

दरम्यान राजू पाटील हे आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे मांडत असतात. सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची ते संधी कधीच सोडत नाहीत. काही दिवसापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पाटलांनी टीका केली होती. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यावर रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदेवर टीका केली होती.

फेरीवाल्यावर राजू पाटलांची आक्रमक भूमिका

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली होती. कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करा अन्यथा इथून पुढे फेरीवाल्यांना नाही तर फेरीवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना ठोकू,अशा इशारा त्यांनी दिला होता. कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासह भाजपला लक्ष केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT