Petrol Pump Closed at Night in Dombivali Saam
मुंबई/पुणे

शिंदे गटातील आमदाराच्या भावावर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ, रात्री ११ नंतर 'नो पेट्रोल', नेमकं कारण काय?

Petrol Pump Closed at Night in Dombivali: शिंदे गटाच्या आमदाराच्या भावानं घेतला मोठा निर्णय. सुरेश मोरे यांनी रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

Bhagyashree Kamble

  • डोंबिवली पश्चिमेत गुन्हेगारी प्रकरणात वाढ.

  • पेट्रोल पंपावर गुंडगिरी वाढली.

  • आमदाराच्या भावावर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ.

डोंबिवली म्हणजे कलाकारांचं शहर. या शहरानं अनेक साहित्यिक, कलाकार आणि विचारवंत देशाला दिले आहेत. मात्र, आता डोंबिवलीची ओळख आता गुन्हेगारीमुळे धुसर होत चालली आहे. गुंडगिरी, गुन्हेगारी वाढत असल्यामुळे आमदाराच्या भावावर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांना रात्री ११ नंतर पेट्रोल मिळणार नाही आहे.

डोंबिवली पश्चिमेतील राजू नगर- गणेश परिसरात शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांचे चुलत बंधू सुरेश मोरे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंप आहे. मात्र, गुंडगिरीचा त्रास वाढल्यामुळे त्यांनी पेट्रोल पंप संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. गुंडगिरीचा त्रास वाढल्यामुळे सुरेश मोरे यांनी ११ ते सकाळी ६ या वेळेत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोल पंपावर त्यांनी आपली व्यथा स्पष्ट मांडली. बॅनरवर लिहिले की, "पेट्रोल पंपाची वेळ ही सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत असेल. रात्रीच्या वेळेस दारू पिऊन काम करणाऱ्या मुलांना शिवीगाळ करणे, धमकी देणे या त्रासाला कंटाळून रात्री पंप बंद राहील". अशा सूचना लिहिण्यात आले आहे.

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस मद्यधुंद तरुण पेट्रोल पंपावर येतात. ते कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देतात, शिवीगाळ करतात आणि मारहाण करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.​या वाढत्या त्रासाला कंटाळून आणि कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आल्याने, अखेर पंपचालक सुरेश मोरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्याच कुटुंबातील सदस्याला जर या गुंडगिरीचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे डोंबिवलीच्या 'सुसंस्कृत' प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT