Shiv Sena MLA disqualification case Supreme Court hearing Today Rahul Narwekar to submit new schedule Saam TV
मुंबई/पुणे

MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्षांचं नवं वेळापत्रक मान्य होणार? सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय घेणार?

Shiv Sena MLA Disqualification case: राहुल नार्वेकर आज कोर्टात नवं वेळापत्रक सादर करणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे वेळापत्रक मान्य करणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Satish Daud

Shiv Sena MLA Disqualification case

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचं नवं वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राहुल नार्वेकर आज कोर्टात नवं वेळापत्रक सादर करणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट हे वेळापत्रक मान्य करणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सुधारित वेळापत्रक तयार केले आहे. या वेळापत्रकानुसार आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चार ते पाच महिने लांबण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने काळात सुनावणी घेता येणार नसल्याचा दावा राहुल नार्वेकर यांनी केला आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांच्या या वेळापत्रकास मान्यता देणार का, हा प्रश्न आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासोबत चर्चा केली. नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावरून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीच्या वेळी संताप व्यक्त केला होता.

तुषार मेहता यांना वैयक्तिक लक्ष घालून वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी मेहता यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतं आहे. आजच्या सुनावणीवेळी सुधारित वेळापत्रकाबाबत तुषार मेहता विधानसभा अध्यक्षांची बाजू मांणार आहे.

मूळ शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी घ्यावा लागणार असून त्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय गृहीत न धरता स्वतंत्रपणे पुरावे तपासून निर्णय घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यानंतर अपात्रता याचिकांवर सुनावणी होणार असून प्रत्येक आमदाराविरोधातील मुद्द्यांवर त्याचे म्हणणे व त्याने सादर केलेले पुरावे तपासावे लागतील. आज कोर्टाने साक्षीपुराव्यांना मनाई न केल्यास सुनावणी लांबण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT