Uday Samant on Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Uday Samant on Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : उद्योग मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. तसेच ठाकरे बंधुंच्या युतीबद्दलही मोठ वक्तव्य केलं आहे.

Prashant Patil

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज तब्बल १९ वर्षांनी एकत्र व्यासपीठावर आले. आजच्या मेळाव्यातील ठाकरे बंधुंच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. उद्योग मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीही पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली आहे. तसेच ठाकरे बंधुंच्या युतीबद्दलही मोठ वक्तव्य केलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, 'जो प्रतिसाद राज ठाकरेंच्या भाषणाला होता, तो दुसऱ्या भाषणाला निम्माही नव्हता. एक भाषण मराठीच्या कल्याणाचं होतं, तर दुसरं भाषण सत्तेसाठी होतं. राज ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण भाषणात कुठेही आम्ही एकत्र येऊ असं म्हटलेलं नाही. आजचा मेळावा मराठीपुरता मर्यादित होता, हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. अजून युती झालेली नाही, अजून बोलणी झालेली नाही, मेळावा झाला म्हणजे युती झाली असं नाही. युत्या आघाड्या जाऊ देत असं राज ठाकरे म्हणाले आहेत', असं उदय सामंत यांनी बोलून दाखवलं आहे.

'मराठी माणसाच्या नावावर आजचा मेळावा घेऊन अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आज आलेलं जे संकट आहे ते दूर करण्यासाठी एखाद्याचा हात लागतो, म्हणून हे षढयंत्र होतं', असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ते पुढे म्हणाले की, 'आम्ही राज ठाकरेंवर टीका का करावी. आम्ही आमची भूमिका मांडतोय. आम्ही राजकीय नितीमुल्ये सांभाळतो. बाकीचं भाषण शिवीगाळीचं, त्यावर टीका होते. राज ठाकरेंचं भाषण हे आम्ही खिलाडू वृत्तीने घेतो'. उद्धव ठाकरे यांनी लिंबू मिरचीवरुन केलेल्या टीकेला उत्तर देताना सामंत म्हणाले की, 'लिंबू मिरचीवर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल , एवढं मी सांगतो. माझ्याबरोबर ३ ते ४ लोकांना अशी पत्रकार परिषद घ्यावी लागेल', असं सामंत म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT