Sanjay Raut Latest Marathi News, Maharashtra Political Crisis
Sanjay Raut Latest Marathi News, Maharashtra Political Crisis Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी कामाठीपुऱ्यात जावं; संजय राऊतांची जीभ घसरली

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फ्लोअर टेस्ट म्हणजेच बहुमत चाचणी करा, असं पत्र दिलं आहे. दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत असतानाच, दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी कामाठीपुऱ्यात जावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी अलिबाग येथे शिवसैनिकांना संबोधित केलं. राज्यातील सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना मेळाव्यांमध्ये मार्गदर्शन करणं सुरु ठेवलं आहे. आज अलिबागमध्ये संजय राऊत यांनी कुणीतरी माझा उल्लेख अलिबागचा पुत्र असा केलाय, असं म्हटलं.

दि.बा. पाटील हे मोठे नेते होते, बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते. आपल्याला या सभेनंतर कार्यक्रम करायचा आहे. करेक्ट कार्यक्रम म्हणतात ना आपल्याला तसं करायचंय. शिवसैनिक जागेवर आहेत, आमदार वॉकरवर गुवाहाटीला चालतात, असा टोला संजय राऊत यांनी महेंद्र दळवींना लगावला.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना कामाठीपुऱ्यात जाण्याचा सल्ला दिला 'शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या आमदारांचा दलाल म्हणून उल्लेख करीत पैशासाठी आले आणि पैशासाठी गेले, ह्याच्या पेक्षा कामाठीपुर्‍यात गळ्यात बोर्ड लाऊन उभे राहा' असा बोचरा सल्ला राऊत यांनी अलिबागमध्ये बोलताना बंडखोर आमदारांना दिला.

दरम्यान, शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून या सत्तासंघर्षात एंट्री केली आहे. फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी आपण उद्याच मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उद्या राज्यपाल हे फ्लोअर टेस्टची मागणी करू शकतात.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Breakfast Recipe: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

Kopardi Death Case: मोठी बातमी! कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या

Today's Marathi News Live : नसीम खान नाराज; पक्षश्रेष्ठींकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु

Josh Baker Death: धक्कादायक! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन, क्रिडाविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT