Neelam Gorhe, Pune Bungalow Intrusion Saam TV
मुंबई/पुणे

हातात हातोडा,पकड आणि दोरी; शिवसेना नेत्याच्या घरात पहाटे तरूण शिरला अन्...पुढे जे घडलं त्याने पोलीसही चक्रावले

Shiv Sena Leader : शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील बंगल्यात पहाटे एका तरुणाने घुसखोरी केल्याने खळबळ उडाली. तरुणाकडून हातोडा, पकड, हातमोजे आणि १० मीटर दोरी आढळली.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Neelam Gorhe, Pune Bungalow Intrusion : विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील बंगल्यात पहाटेच्या सुमारास एका अज्ञात तरुणाने केलेल्या घुसखोरीने खळबळ उडाली आहे. हातात हातोडा, पकड, हातमोजे आणि तब्बल १० मीटर लांबीची दोरी घेऊन या तरुणाने बंगल्यात प्रवेश केला होता. इतकेच नव्हे, तर पकडले जाण्यापूर्वी त्याने बंगल्यातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटेच्या सुमारास एका तरुणाने प्रवेश केल्याने सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. २६ सप्टेंबर शनिवारी रोजी सकाळी ६.१५ वाजता ही घटना घडली. या घुसखोराने रात्री ३ वा नीलम गोर्हे यांच्या घराच्या गच्चीवर प्रवेश केला होता व सकाळी ७ वा बंगल्याचा सुरक्षारक्षक व ड्युटीवरील पोलीसाने त्याला पकडले.

संबंधित तरुणाच्या बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि सुमारे दहा मीटर लांबीची दोरी आढळल्याचे प्रथम माहिती अहवालात नमूद आहे.तसेच त्याआधी घरातील पाण्याच्या टाकीचे कनेक्शन ही बंद केले होते. शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाने आपण विद्यार्थी असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्याकडे वेगवेगळ्या नावांची ओळखपत्रे असल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे. मग तो पहाटे डॉ. गोऱ्हे यांच्या निवासस्थानी का आला? त्याच्याकडील साहित्याचा उपयोग कशासाठी होणार होता? त्याची खरी ओळख काय? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे. घटनेच्या वेळी डॉ. गोऱ्हे घरी नव्हत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर १० राऊंड फायरिंग; 2 जण गंभीर जखमी, सिनेसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT