Shiv Sena Leader Arrested In Extorting And Assaulting Case saam tv
मुंबई/पुणे

Shiv sena Leader: मराठी माणसाचं दुकान हडपणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याला बेड्या, खंडणी अन् मारहाणीचा आरोप

Shiv Sena Leader Arrested In Extorting And Assaulting Case: कांदिवली पश्चिमेकडील इराणीवाडीतील शिंदे गटाच्या शिवसेना विभाग प्रमुखाने एका मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा प्रकार समोर आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीडमधील राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांची दहशत अद्याप संपलेली नसतानाच मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील इराणी वाडी परिसरात देखील राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सक्रिय असलेल्या चुहा गँगची परिसरात प्रचंड दहशत आहे. याच गँगचा प्रमुख असलेला शिवसेना शिंदे गटाचा विभाग प्रमुखास खंडणी प्रकरणी अटक करण्यात आलीय.

खंडणी, झोपडपट्ट्यांमधील जागा हडप करणे, धमकावणे अशा प्रकारचे 35 पेक्षा अधिक गुन्हे या चुहा गँगवर आहेत. या गँगचा प्रमुख लालसिंग राज पुरोहित आहे. लालसिंग राज पुरोहित याला कांदिवली पोलिसांनी काल रात्री फसवणूक आणि अनधिकृत कब्जा प्रकरणात गुजरात येथून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून कांदिवली पश्चिमेकडील इराणी वाडी परिसरात रामकिशन चव्हाण उर्फ चुहा हा आपल्या 20 ते 25 गुंड मित्रांच्या मदतीने परिसरात दहशत करत होता.

याच टोळीचा एक भाग असलेला लालसिंग राज पुरोहित हा शिवसेना शिंदे गटाचा कांदिवली विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होता. याने याच टोळीच्या मदतीने परिसरात झोपडीधारकांच्या झोपड्या अनधिकृतपणे कब्जा मारणे, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहन मालकांकडून अनधिकृत पे अँड पार्किंगचे पैसे वसूल करणे एकच करून अनेक लोकांना विकणे खंडणी आणि ड्रग्स विक्री करण्याचे काम करत होता.

ही कामे करण्यापूर्वी तो पोलिसांचा खबरी होता, याच कामातून त्यांनी पोलिसांशी ओळख वाढवून त्याचा गैरफायदा घेतला. त्या ओळखीचा फायदा घेत त्याने फसवणूक आणि झोपड्या अनधिकृतपणे कब्जा करण्याची गुन्हे केली. लालसिंग राजपुरोहितने पै कुटुंबीयांचा इराणी वाडीमधील गाळा सुरुवातीला भाड्याने घेतला. काही महिने भाड्याचे पैसे वेळेवर दिले, मात्र लॉकडाऊन काळात पैसे थकवण्यात आले. त्याच काळात दत्ताराम यांना पक्षाघाताचा झटका आला आणि उपचारासाठी त्यांना अंधेरीतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठी 25 लाखांपेक्षा अधिक रुपये खर्च झाल्याने पैशांची गरज वाटू लागली, म्हणून पै कुटुंबीयांनी तो गाळा विकण्याचे ठरवले.

ही गोष्ट लालसिंग राजपुरोहितला समजल्यानंतर त्याने तो गाळा विकत घेण्याचे ठरवले, मात्र यासाठी ५७ लाख रुपये तुम्हाला देऊ असे लालसिंग राजपुरोहित सांगितले. यासाठी करार केल्यानंतर पै कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्यात आले. उर्वरित पैसे ९० दिवसात देऊ, असे म्हटले मात्र ९० दिवस उलटून गेल्यानंतरही लालसिंग राजपुरोहितने पै कुटुंबीयांना व्यवहारातील ठरलेले पैसे दिले नाहीत.

पै कुटुंबीयांकडून वारंवार तगादा लावल्यानंतरही लालसिंग राजपुरोहितने पैसे न देता उलट त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. पैसे मागितल्यास जीवे मारून हातपाय तोडून फेकून देऊ, अशी धमकी दिली. या प्रकरणी पै कुटुंबीयांनी कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली, मात्र पोलिसांशी जवळीक असल्यामुळे त्यावर गुन्हा दाखल झाला नाही.

मात्र पै कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घेतली. याप्रकरणात न्याय मिळवून द्यावा, यासाठी मागणी केली. दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली. यानंतर गाळा पै कुटुंबीयांना परत करा किंवा त्यांचे पैसे त्यांना द्या , असे शिंदे यांच्या कार्यालयातून लालसिंग राजपुरोहित याला सांगण्यात आले. अखेरीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था) आणि डीसीपी भोईटे यांना लालसिंग राजपुरोहित विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

रविवारी ९ मार्च रोजी लालसिंग राजपुरोहित विरोधात फसवणूक आणि धमकावणे प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी आरोपी लालसिंग राजपुरोहित याला शोधण्यासाठी पथक नेमले. अखेरीस कांदिवली पोलिसांनी आरोपी लालसिंग राजपुरोहित याला गुजरात येथून अटक केली. सध्या आरोपी कांदिवली पोलिसांच्या ताब्यात असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT