shivsena SaamTV
मुंबई/पुणे

शिवसेना नेत्याची महिला ऑटो चालकाकडे शरीर सुखाची मागणी, नेत्याला महिलेकडून मारहाण

२४ जानेवारी रोजी महिलेने शिवसेना नेत्याला विरार येथील फुलपारा येथे भेटण्यासाठी बोलावले. ते तेथे पोहोचताच पूर्वनियोजित योजनेनुसार महिलेने स्थानिक लोकांच्या मदतीने नेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महिला ऑटो चालकाचा छळ करून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून शिवसेनेने (Shivsena) पक्षनेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, आरोपी जितेंद्र खाडे (Jitendra Khade) यांना तत्काळ बडतर्फ करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनीही (police) याप्रकरणी खाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Shivsena Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनाथ नगर येथील वॉर्ड प्रमुख जितेंद्र खाडे यांनी एका महिला ऑटो चालकाची छेड काढली. एवढेच नाही तर खाडे यांनी महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वर्दे यांनी सांगितले की, खाडे यांनी महिला ऑटोचालकाच्या गाडीवरून तिचा नंबर घेतला आणि नंतर फोन करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर खाडे यांनी महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला.

हे देखील पहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी महिलेने खाडे यांना विरार येथील फुलपारा येथे भेटण्यासाठी बोलावले. ते तेथे पोहोचताच पूर्वनियोजित योजनेनुसार महिलेने स्थानिक लोकांच्या मदतीने खाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जितेंद्र खाडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच खाडे यांनी पक्षाची बदनामी केली असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

IPL Playoff Scenario: पंजाबच्या पराभवाचा फायदा चेन्नई-कोलकात्याला, वाचा ८ संघाचे प्लेऑफचे नेमकं गणित

Diabetes Diet Tips: डायबिटीजमध्ये ब्रेड खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हे 3 ब्रेड ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT