eknath shinde and aaditya thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Shinde vs Thackeray : शिंदे गट आदित्य ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

शिवसेना एकनाथ शिंदे गट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. युवासेनेचे काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. युवासेना सहसचिवांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर लवकरच ते आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास ४० हून अधिक आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. सुरूवातील आमदार त्यानंतर खासदार, नंतर नगरसेवक तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यामुळे शिवसेनेला मोठी गळती लागली. इतकंच नाही तर या बंडामुळे राज्यातील राजकारणात सुद्धा मोठी उलथापालथ झाली.

दरम्यान, आता शिवसेनेपाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेलाही मोठी गळती लागण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवासेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव शर्मिला येवले यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे.  (Latest Marathi News)

या भेटीनंतर लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. विशेष म्हणजे युवासेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव यांनी कालच पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकारपरिषदेत त्यांनी आम्हाला ठाकरे गटामध्ये कामासाठी संधी मिळत नाही, असं म्हटलं होतं. दरम्यान, आज युवासेना सहसचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने आता युवासेनेतही फूट पडणार का?, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT